By  
on  

बिग बॉस मराठी 3: बिग बॉसच्या घरातील हा दिवस आहे खास, येणार आहेत हे पाहुणे

बिग बॉसच्या घरातील वीकेंड नेहमीच खास असतो. कारण असते प्रत्येक वीकेंडला असलेली चावडी. चावडीत यावेळी आठवडाभरात घडलेल्या घडामोडींवर सुत्रसंचालक महेश मांजरेकरांची करडी टिप्पणी असते. पण यावेळी मात्र काहीसं हटके घडताना दिसत आहे. 

 

 

यंदाच्या बिग बॉसमध्ये खास पाहुणे येणार आहेत. बिग बॉसच्या दुस-या सीझनमधील स्पर्धक शिव ठाकरे आणि नेहा शितोळे सदस्यांच्या भेटीला येत आहेत. यावेळी सदस्यांना काही टिप्स देताना दिसतील. यासोबच जयला एक अवघड टास्कही नेहाने दिला आहे, या टास्कमध्ये जय स्नेहाची निवड करतो की गायत्रीची हे पाहणं रंजक ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive