By  
on  

बिग बॉस मराठी 3: खेळातील धसमुसळेपणामुळे ओढवला बिग बॉसचा रोष, होणार डायरेक्ट नॉमिनेशन ?

बिग बॉसच्या घरातील या आठवड्याची सुरुवात रणधुमाळीने झाली आहे. ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ या टास्कमध्ये सदस्यांमध्ये हाणामारी आणि शिविगाळ करण्यापर्यंत मजल गेली. या टास्क दरम्यान आदिश- जयचा वाद असो किंवा विशालने तुरुंग तोडण्याची कृती असो. यावेळी सदस्यांनी काही मर्यादा ओलांडल्या आहेत. 

 

 

या नियमभंगाची शिक्षा म्हणून घरातील सर्व सदस्य नॉमिनेट झाले आहेत. बिग बॉस यांनी नियम भंगाची शिक्षा म्हणून घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट केलं आहे. आता यावर कॅप्टन्सी टास्कबाबत काय निर्णय होतो ते लवकरच समजेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive