By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 24 : कोणाच्या वागण्याचे मीराला इतके वाईट वाटले की ती रडू लागली?

आक्रमकता आणि धक्काबुक्की कार्यामध्ये केली गेली. ही वागणूक लज्जास्पद असून बिग बॉस यांनी घरातील सर्व सदस्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. बिग बॉस यांनी साप्ताहिक कार्य रद्द केले. तर गायत्री आणि स्नेहा रागावरचे नियंत्रण गमावून आक्रमक झाल्या ज्यामुळे सदस्यांना शारीरिक इजा होऊ शकत होती आणि बिग बॉस यांना हे अमान्य आहे. आणि म्हणूनच त्या दोघींना देखील पुढील आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट केले.


हे सगळे राडे घडत असतानाच मीरा गायत्रीसमोर तिचं मनं मोकळं करताना दिसणार आहे. कालसमोर आलेल्या प्रोमोनुसार मीरा गायत्रीसोमर तिची खंत व्यक्त करताना दिसणार आहे. ज्यामध्ये तिला अश्रु अनावर झाले, आणि तिचा बांध तुटला. मीरा गायत्रीसमोर ढसाढसा रडली.

नक्की असं काय घडलं ? कोणी मीराला दुखावालं ? कोणाच्या वागण्याचे मीराला इतके वाईट वाटले असावे ? मीरा गायत्री म्हणाली, “मला ऐकवायचे आहे... नाहीतर भांडायचे आहे... मला काहीतरी बोलायचे आहे, नाहीतर नाही होणार माझ्याकडून, माझ्या मनामधून नाही निघणार... नाही सहन होतं....

 
बघूया नक्की काय काय घडलं  बिग बॉस मराठीच्या घरात... तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive