By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 24 : तृप्तीताईंना पडला हा प्रश्न ...

बिग बॉस मराठीच्या घरात वाद विवादा बरोबरच सदस्य बरीच धमाल मस्ती देखील करताना दिसतात. आज तृप्ती ताईंना प्रश्न पडला आहे “एक दुसरे के लीये बेकरार हम...” किस लीये बेकरार ? आज घरामध्ये हेच मॉर्निंग सॉन्ग वाजवलं असणार... आणि मग कुठेतरी या चर्चेचा संदर्भ विशाल कडून काल झालेल्या नियमभंगाकडे गेला.

उत्कर्ष त्यावर म्हणाला “मारामारी करायला, मारझोड करायला. जय म्हणाला “जेलचं तोडला त्याने. तृप्ती ताई म्हणाल्या “इथे काही ठेवलं तरी तो तोडेल तो...” दादूस म्हणाले “जेल तोडण खूप मोठा गुन्हा आहे माहिती आहे का... हे असं करताना त्याचाच पाय अडकला असता तर ?”. तृप्तीताई लगेच म्हणाल्या “तोडफोड करणं मोठच आहे ... कशाला तोडफोड करायची? एकदम चुकीचं आहे, कुणीच नाही करायचं.”
 
बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये अजून काय काय घडलं जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive