बिग बॉसमध्ये स्नेहा वाघची तुलना सुरुवातीला पहिल्या सीझनमधील विजेती मेघा धाडेशी केली जात होती. पण स्नेहाचं आणि जयचं बाँडिंग वाढल्यानंतर मात्र अनेकांनी यावर नापसंती व्यक्त केली. यानंतर स्नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
स्नेहा रोज सकाळी उठल्यावर बिग बॉस घरातील कॅमे-याकडे बघून ‘saranghae big boss’ म्हणत असते. नेटिझन्सनी यावर भन्नाट मीम्स तयार केले आहेत. खरं तर saranghae हा कोरिअन भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ I love you असा होतो. पण एखाद्या गोष्टीवर शांत बसतील ते नेटिझन्स कसले. त्यांनी स्नेहाच्या या कृतीवर भन्नाट मीम्स व्हायरल केले आहेत.