बिग बॉसच्या घरातील चावडीवर सदस्यांच्या आठवड्याच्या कामाचा हिशोब महेश मांजरेकरांकडून मांडला जातो. पण या शनिवारच्या चावडीवर मात्र महेश यांचा वेगळाच अंदाज दिसून आला. यावेळच्या चावडीवर महेश सदस्यांवर बरेच नाराज झालेले दिसून आले. शोच्या सुरुवातीलाच त्यांनी सदस्यांशी बोलण्याची इच्छा नसल्याचं सांगत टि. व्ही बंद केला होता.
पण त्यानंतर सदस्यांनी माफी मागितल्यावर ते चावडीवर परतले. यानंतर मात्र प्रत्येक सदस्याच्या कृतीचा त्यांनी खरपुस समाचार घेतला आहे. मीरा- गायत्री पासूनस सुरुवात करत त्यांनी ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ या टास्क मध्ये झालेल्या गोंधळाबाबत टिप्पणी केली. यावेळी महेश यांनी या सीझनमध्ये तुम्ही मला लाज आणलीत असे उद्गार काढले. यावेळी स्नेहा, दादुस तृप्ती, मीरा, गायत्री, जय, सोनाली, उत्कर्ष आणि जय यांना बरंच सुनावलं.