बिग बॉस मराठी 3 Day 26 : जय म्हणतो, 'आता आपण आविष्कारसारखं खेळूया'

By  
on  

आज जय, मीरा, उत्कर्ष आणि गायत्री एका मुद्द्यावरून घरामध्ये सांभाषण करताना दिसणार आहेत. जय आणि उत्कर्ष एका गोष्टीवर बोलत असताना जय म्हणाला, “काय करायचं तर ते कर मला नको विचारूस. मी काहीतरी बोलायला जातो, उलट माझ्यावर येतं... मी आता काही बोलणारच नाहीये. मीराच त्यावर म्हणण होतं “मलासुध्दा हेच बोललं जातं”.

जय यावर म्हणाला, “मला असं वाटतं आपण आता कसं खेळल पाहिजे आविष्कार दादासारखं... रविवारी सेफ व्हायचं आणि झोपून जायचं. उत्कर्षने जयला समजावले, सरांना खूप अपेक्षा आहेत आपल्याकडून... आपण ते केलचं पाहिजे. जसं सर म्हणतात सूर गवसेल तुम्हांला... कळणार आपल्याला. जय म्हणाला, “सर जे म्हणाले मला तू स्ट्रॉंग प्लेयर आहेस, सरांना एकचं प्रॉब्लेम आहे माझा anger… तर मी फक्त टास्कमध्येच खेळणार बाकी शांत बसणार.”

तेव्हा बघूया आज काय काय घडणार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये... बघत रहा बिग बॉस मराठी दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

 

Recommended

Loading...
Share