बिग बॉस मराठी 3 Day 27 : “तृप्तीताई नुसतं सगळं कॅमेरासाठी करतात” – गायत्री

By  
on  

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “संयमाची ऐशी तैशी” हे साप्ताहिक कार्य आज रंगणार आहे. या कार्यामध्ये कोणाचा संयम तुटणार ? कोण संयमाला धरून चालणार ? आजच्या भागामध्ये कळेलच. आज टास्क दरम्यान गायत्री आणि विकास तृप्तीताईंना ऐकवणार खडेबोल...


 
गायत्री म्हणाली, “तृप्तीताईंना तर काहीच नाही येत करता... नुसतं सगळं कॅमेरासाठी करायचं. सगळं biased करायचे. तृप्तीताई म्हणाल्या “मला बांधू द्या... तुम्ही म्हणाल तसं” गायत्री म्हणाली, आम्ही राक्षस नाही तुम्ही राक्षस आहात खरंतर तर. एक साधा महामेरू बांधता येत नाही, या कसल्या देवदूत ? बांधता पण येत नाही नीट हो ना ? विकास आणि गायत्री बोलताना दिसणार आहे फक्त खोट बोलतात तृप्तीताई. त्या नाही या टीमकडून नाही त्या टीमकडून बरोबर ना ?
 
बघूया आता विकास आणि गायत्रीच्या या बोलण्यावर तृप्तीताई संयम दाखवतील की उत्तरं देतील. जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Recommended

Loading...
Share