By  
on  

बिग बॉस मराठी 3: पुन्हा विशाल आणि विकास येणार आमने- सामने ?

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडले “स्वर्ग की नरक” हे नॉमिनेशन कार्य. ज्यामध्ये स्वर्गात कोण जाणार आणि नरकामध्ये कोण जाणार हा निर्णय संपूर्णपणे दादूस यांचा होता ज्यांना तीन सल्लागार देखील देण्यात आले होते विशाल, स्नेहा आणि गायत्री. ज्यामध्ये काल मीनल आणि विकास जेव्हा आपली बाजू मांडायला आले तेव्हा विशाल याने सल्लागार म्हणून त्याचे परखड मत मांडले जे कुठेतरी विकासला अजिबात आवडले नाही.

 

कारण विकासच्या मते विशालचा बालिशपणा त्यामधून कुठेतरी दिसून आला. आणि त्याच्या विरोधात मुद्दे शोधले जात आहेत असे देखील त्याला वाटले. काल विकास या झाल्या प्रकारामुळे भावुक देखील झाला, त्याला अश्रु अनावर झाले विशालने असे वागणे आणि बोलणे त्याने कधीच एकस्पेक्ट केले नव्हते. विशाल याचविषयी विकासशी बोलणार आहे.

 
विशाल विकासला म्हणाला, मला माझं मतं मांडायचे होते ना विकास. विकास म्हणाला, गायत्री माझ्या बाजूने बोली मग ती जास्त चांगली आहे माझ्यासाठी. मीनल आणि विशालचं म्हणण पडलं ठीक आहे मग तू तसा विचार कर. विकास म्हणाला, तुम्ही माझ्याविरोधात बोलत आहेत. विशाल तू विरोधात नाही तू विरोधात मुद्दे तयार केले आणि बोलास. तू आधीच ठरवलं होतंस तसं. मीनल आणि विशाल म्हणाले असं नाहीये, तुझा अविश्वास दिसून येतं आहे, तू prove केलं. विकास म्हणाला मीनल मी तुझ्या विरोधात कधीच काही बोलो नाही, तू माझ्या विरोधात बोलीस, कधीतरी अॅक्सेप्ट कर. तू स्वत:ची चूक मान्य कर. मीनल म्हणाली, तू आता बोलतो आहेस सगळीकडे बोल तू...”

Recommended

PeepingMoon Exclusive