बिग बॉस मराठी 3: जयने गायत्रीला दिला हा खास सल्ला

By  
on  

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यामुळे घरातील बरीचशी मंडळी दुखावली गेली आहेत. कालच्या भागामध्ये विशालच्या निर्णयामुळे आणि त्याने मांडलेल्या मुद्द्यांमुळे विकास बराचसा दुखावला गेला. तो ते आज मीनल, सोनाली, आविष्कारसमोर विशालला बोलून दाखवणार आहे.

कालच्या भागामध्ये स्नेहाच्या वक्ताव्यामुळे मीराला तिचा खूप राग आला तिने तसे गायत्रीला बोलून देखील दाखविले बस झाली मैत्री. आजच्या भागामध्ये उत्कर्ष गायत्री आणि जयला तिचं गोष्ट सांगताना दिसणार आहे. उत्कर्ष म्हणाला, मीरा मला म्हणाली माझ्या डोक्यात गेली आहे, माझी सटकली आहे... मी तिला विचारलं का काय झालं ? ती मला म्हणाली स्नेहा ऐकलं ना मला काय बोली ती... मी तिला बोलो थांब... मीरा म्हणाली मी तिच्याशी बोलणारच नाही...

गायत्री म्हणाली, नाही मला पण राग आला, तिने जे केलं ते चुकीच केलं. मी तात्पुरता नाही बोलणार स्नेहाशी... जय तेव्हा गायत्रीला सांगताना दिसणार आहे, असं नका करू, कारण की हे असं शाब्दिक होतं... समोर जे सदस्य उभे होते ते तुमच्यासमोर सांगत होते, तुझ्या तोंडुन देखील भरपूर काही गोष्टी निघाल्या असतील त्यांच्याबद्दल जे आपल्या टीममध्ये नाहीये. ज्या नेगेटिव्ह असू शकतात असं त्यांना वाटू शकतं. तर तो मुद्दा घेऊन कोणीच तुझ्याकडे येऊन भांडलं नाहीये. कारण we should take it in a sporting way. जसं सर नेहेमी म्हणतात, टास्क आणि आत मधल्या गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या करा... का तर त्याच्यामागे हीच कारण आहेत...”

Recommended

Loading...
Share