By  
on  

बिग बॉस मराठी 3: सोनालीला या कारणासाठी वाटते आहे जयची भिती

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या प्रत्येक सदस्य स्ट्रॅटजी प्लॅन करतो आहे. मग ते उत्कर्ष, जय, विशाल आणि विकास असो वा मीनल आणि सोनाली असो. मीनल आणि सोनाली आज जपून दांडा धरा टास्कबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये सोनालीला जयची कुठेतरी भीती वाटते आहे असे दिसून येते आहे.

 

सोनाली मीनलला सांगताना दिसणार आहे, “हा म्हणत होता की मला कॅप्टन नाही व्हायचं आहे, कुठेतरी त्यांना असं वाटतं आहे की मुला मुलांमध्ये जे काही होईल... पण कुठेतरी त्याने टेंशन घेतला आहे. मीनलचे म्हणणे आहे, प्रॉब्लेम कुठे होतो जिथे जय, उत्कर्ष आणि विशाल, विकास येणार तिथे ते म्हणणार आपण खेळुय आणि नंतर बघूया...

 

पण शेवटी ते दोघे या दोघांवर गेम करतात. सोनालीचे म्हणणे आहे, “मी विशालला सांगितले समजा तू, जय आणि उत्कर्ष राहिलात तर एका पोलवर तू आणि जय पडू नका. कारण मग जय उंची वापरुन किंवा अजून काहीतरी वापरुन स्ट्रॅटजी करणार, आणि उत्कर्ष जाणार त्याच्या पोलवर. म्हणजे ही दोघं नको राहायला.

Recommended

PeepingMoon Exclusive