By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 41 : विशाल मीनलचा अबोला संपणार की आणखी वाढणार?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रूसवे फुगवे हे सुरूच असतात. पण, विशाल आणि मीनलचा अबोला काही संपायचं नावचं घेत नाहीये. टास्कनंतर झालेल्या बाचाबाचीमध्ये मीनल विशालला कानाखाली मारेन, मला हात नाही घाण करायचे असे बरेच काही बोलून गेली आणि तेव्हापासून दोघांमध्ये हा अबोला सुरू झाला.
 
आज मीनल, विशाल, विकास आणि सोनालीमध्ये यावरूनच चर्चा होताना दिसणार आहे. सोनाली विशालला म्हणाली, सुरुवात तरी करा बोलायला... विशाल म्हणाला पाया पडू तुझ्या... सोनाली म्हणाली, ती पण करेल, तू पण काही मनामध्ये पकडू नकोस.

मीनल त्यावर म्हणाली, मला काही नाही बोलायला. त्यावर विशाल म्हणाला, तू मीनल शाह आहे मी विशाल निकम आहे. तुझं मनं खूप मोठ आहे माझं नाहीये. विकासचे म्हणणे आहे, तू पण जे बोलास ते पण चुकीचे होते... विशाल म्हणाला मी काय चुकीचे बोलो ? विकास आणि सोनाली विशालला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. आणि ही सगळी चर्चा सुरू असताना मीनलला रडू कोसळले.

बघूया हा अबोला कधी तुटणार ?

 
पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive