बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुरू होणार नवा आठवडा. घरामध्ये रंगणार नवे टास्क… आता या टास्क दरम्यान वादविवाद, भांडण झाली नाही तर टास्क खेळतो आहे असे सदस्यांना वाटणारच नाही ना ! आज बिग बॉसद्वारे देण्यात येणार्या टास्कचा संचालक असणार आहे जय. आणि टास्क दरम्यान होणार जय आणि सोनालीमध्ये हे भांडण. आता नक्की काय झालं ? कशावरून हा वाद वाढला हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा. सोनालीचे म्हणणे आहे, प्लॅनिंगमध्ये होता तो. उत्कर्ष, गायत्री, मीराने प्लॅनिंग करू दे...सगळ्यांनी करू दे नो प्रॉब्लेम, त्यामध्ये संचालक नाही पाहिजे...
विकास त्यावर म्हणाला सगळ्यांनी बघितली आहे ही गोष्ट. दादूस पण या वादामध्ये आपले मत मांडताना दिसणार आहेत. जय त्यावर म्हणाला, Shut Up…Please Shut Up … talk to my bottle… त्यावर सोनाली म्हणाली, तुझ्याबाजूने बोले तेदेखील तुला कळालं नाही. तर आज काय कळणार आहे. बघूया हा वाद अजून किती वाढला...