बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार खास पाहुणे... हो ! म्हणजेच झिम्मा चित्रपटाचे कलाकार आज सदस्यांना भेटायला घरामध्ये जाणार आहेत. काय काय धम्माल मस्ती केली सदस्यांसोबत हे आज कळणारच आहे. पण, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्य डांस करताना, गेम खेळताना दिसतं आहेत. सदस्य काही fun टास्क करताना दिसणार आहेत.
सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांनी सदस्यांशी संवाद साधला. बिग बॉस यांनी सोनाली आणि मृण्मयी यांचे स्वागत करताच सोनालीने सांगितले, अरे माझं स्वप्नं होतं की कधीतरी बिग बॉसने माझं नावं घ्यावं. खरंतर मी ही फिल्म केली... लंडनला जाऊन शूट करायला मिळेल, चांगला सिनेमा, रोल आहे यामुळे नाही. मला माहिती होतं याचं प्रोमोशन बिग बॉस मध्ये होणार...”
काल “मिशन नॉमिनेशन” हे कार्य घरामध्ये पार पडले. ज्यामध्ये स्नेहा, उत्कर्ष, गायत्री, मीरा, दादूस, सोनाली हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले. बघूया या आठवड्यात कोण जाणार घराबाहेर ? आणि कोण होणार सेफ ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.