By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 43: नव्या टास्कसाठी पुन्हा एकदा भिडणार टीम A आणि टीम B

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे “ही पाइपलाईन तुटायची नाय” हे साप्ताहिक कार्य. आणि याच टास्क दरम्यान Team B भिडणार आहे Team A ला. आता नक्की या कार्यामध्ये पुढे काय होणार ? कोण बाजी मारणार ? कोण हारणार... हे कळेलच. याच टास्कमध्ये मीराच्या व्यक्तव्यामुळे सोनाली आणि विकासमध्ये वादाची ठिणगी पडली... जिथे मीराने सांगितले तू इथे आल्यावर आम्ही नक्कीच करू सपोर्ट... बघूया टास्कमध्ये नक्की काय घडणार आजच्या भागामध्ये.

 टास्क दरम्यान मीराने विकासला ओरडून सांगितले, विकास तू जेव्हा इथे बसशील तेव्हा आम्ही करू एवढं लक्षात ठेव. आम्ही सपोर्ट करू तुला, कारण तू ऐकतोस तरी. विकास जयला सांगणार आहे आम्ही जॉइन हवे आहेत... {कारण पाइपलाईन पूर्णपणे तयार होण्यासाठी त्या जॉइन्सची गरज आहे आणि जे Team A कडे आहेत.} मीरा म्हणाली, देतो आम्ही... जय म्हणाला, तू जरी पोहचलास ना तरी मी नाही तोडणार.

 

मीराचे म्हणणे आहे, तो (विशाल) जर इथे आला तर आणि तू पण आलास तर नाही मिळणार एवढं लक्षात ठेव. विकास तू जर इथे घुसलास तर नाही मिळणार. आम्ही देतो म्हणालो आहे, जर घुसलात तर नाही मिळणार. विकासने मीराला सांगितले तीन जॉइन दे आम्हांला. बघूया Team B ला Team A सपोर्ट करेल की, घरामध्ये पुन्हा राडे होतील...

Recommended

PeepingMoon Exclusive