By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 44 : सोनाली आणि मीरामध्ये का झाली हाणामारी?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सुरू झाले “ही पाइपलाईन तुटायची नाय” हे साप्ताहिक कार्य. आणि याच टास्क दरम्यान Team B आणि Team A मधील सदस्य एकमेकांना चांगलीच स्पर्धा देत असल्याचे दिसून आले.

यामध्ये विशाल आणि विकासमध्ये मतभेद झाले तर दुसरीकडे सोनाली आणि विकासमध्ये बाचाबाची झाली... ज्यामध्ये सोनालीने विकासवर आरोप केला की तू माझ्यासाठी खेळला नाहीस... यापुढे ती असेदेखील म्हणाली की, मी तुझ्यासाठी नक्की खेळणार... काल कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी एकही सदस्य निवडला गेला नाही... कारण, दोन्ही टीममधील मतभेद आणि मारामारी...

दादूस, सोनाली, गायत्री, विकास सगळे सदस्य कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवण्यास अयशस्वी ठरले. बघूया आज टास्क मध्ये सदस्य काय करतील ? कसा पार पाडतील हा टास्क ?


 
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत आज टास्कमध्ये मीरा आणि सोनालीमध्ये चांगलच राडा झाला आहे असे दिसले. मीरा आणि सोनाली मध्ये हाणामारी का झाली. हे आजच्या भागामध्ये समजेलच पण, मीरा असं देखील म्हणताना दिसणार आहे की, बिग बॉस मला हिच्यापासून धोका आहे. त्यावर विकास म्हणाला, सोनाली ती नाटक करते आहे धरून ठेव तिला... त्यावर जय चिडून म्हणाला तू शांत बसं विकास. मीराचं वाक्य आहे “आईशप्पथ सांगते आहे, बिग बॉस प्लीस थांबवा... नाहीतर ही गेली आज...

 
बघूया टास्कमध्ये नक्की काय झालं आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive