बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम्समध्ये चर्चा होताना दिसणार आहे. बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे काही सदस्यांनी कार्य अनिर्णित कसे ठेवले जाईल या प्रयत्नात दिसले ते सदस्य आज शिक्षेस पात्र ठरणार असून त्यांचे वास्तव्य जेलमध्ये असणार आहे. आणि याचवरुन घरातील सदस्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
ज्यामध्ये मीराचं म्हणणं आहे, शिक्षेस पात्र माझ्यासाठी विकास आहेच, मला माहिती आहे ते माझंचं नावं देणार आहेत... गायत्रीने आणि जयने देखील लगेच सांगितले माझ्यासाठी देखील विकास आहे. नंतर जयचे म्हणणे पडले विकास आहेच आणि विशाल पण आहे.
दुसरीकडे, जेव्हा विकासने विचारले स्नेहाला तिचे म्हणणे आहे जय. विकास त्यावर म्हणाला कहानी मै ट्विस्ट आगया... सोनाली आणि विशाल यांच्या मते जय हे नावं नसावं त्यामुळे त्यांनी याला नकार दिला. विकासने सांगितले मलादेखील पहिले नावं जय वाटले होते.