By  
on  

बिग बॉस मराठी 3: विशालने घेतला महत्त्वाचा निर्णय, या सदस्यांवर होणार परिणाम ?

बिग बॉसच्या घरात सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. नवे मित्र बनत आहेत तर अनेक यारी दोस्ती तुटत आहेत. असंच काहीसं झाल आहे एका ग्रुपमध्ये. बिग बॉसच्या घरात विशाल, विकास, सोनाली आणि मीनल यांच्या मैत्रीबाबत सगळ्यांनाच ठावूक आहे. पण या चौकडीतील एक सदस्य आता बाहेर पडणार आहे.

 

 

सदस्य विशालने आता कोणत्याच ग्रुपचा हिस्सा न बनण्याचं ठरवलं आहे. ‘जवळची माणसंच जास्त त्रास देतात. मी आजपासून, आत्तापासून कोणत्याही ग्रुपचा हिस्सा नाही.’ हे म्हणताना तो दिसतो. हा निर्णय घेताना विशाल यावेळी भावनिक झालेला दिसून आला.  कालच्या चावडीवर महेश यांनीही सतत मीनल आणि सोनालीला बोलण्यावरुन विशालला खडसावलं होतं. आता विशालच्या या निर्णयाचा ग्रुपवर काय परिणाम होतो हे लवकरच समजेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive