बिग बॉस मराठीच्या घरामधून काल स्नेहा वाघ घराबाहेर पडली. आजपासून सुरू झाला आहे नवा आठवडा... घरामध्ये रंगणार नवे टास्क... होणार राडे, बघायला मिळणार कोण कोणाच्या बाजूने खेळणार आणि कोण कोणाच्या विरोधात. नॉमिनेशन टास्कमध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोण होणार नॉमिनेट आणि कोण कोणाला करणार सेफ. तसेच आठवड्याच्या शेवटी घराला मिळणार नवा कॅप्टन. कालसमोर आलेल्या प्रोमोमधून अस दिसून येत आहे, बिग बॉस मराठीच्या घराचे आता मुंबई शहारात रूपांतर होणार आहे.
बिग बॉस यांनी दिला सदस्यांना नवा आणि कठीण टास्क. त्यांनी जाहीर केले, मुंबई हे शहर कधीच झोपत नाही. त्यामुळे या आठवड्यात सगळ्यांना जागं राहावं लागणार आहे. हे ऐकताच सदस्यांची झोप उडाली हे नक्की ! उत्कर्ष त्यावर लगेच गाणं म्हणायला लागला... मुझे निंद क्यु आये, कोई मुझको अब ये बताये... के ऐसा कैसा टास्क आगया !
बघूया टास्क नध्ये नक्की काय होणार ? काय असेल हा टास्क ? तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.