बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज विकास आणि विशालमध्ये आज एक चर्चा चांगलीच रंगणार आहे. काल घरामधून स्नेहा वाघ बाहेर पडली आणि त्याच संदर्भात हे दोघे बोलताना दिसणार आहेत.
विशाल विकासला सांगताना दिसणार आहे, मला असं वाटलं होतं जय हर्ट होईल खूप. बेस्ट बॉन्ड बनून वैगरे मी बघितलं... म्हणजे ते स्नेहाकडून दिसतं होतं खूप, माझ्याशी स्नेहा किती तरीवेळा येऊन बोली जयविषयी.
मुख्यत: नॉमिनेशन झाल्यापासून की त्यांना किती वाईट वाटेल त्यांच्या कॅप्टन्सीसाठी मी झाले नॉमिनेट अणि त्यांच्यामुळे घरी जाणार... समजा मी गेलेच तर. त्या जेवढा विचार करत होत्या ना, कशी हालत होईल जयची आणि सगळं... जाताना पण त्यांनी मला खुणावलं सांभाळा त्यांना अशा पध्दतीने. कशाला सांभाळा आणि सगळं ? विकास त्यावर म्हणाला, नाही ही गोष्ट माझ्यापण लक्षात नव्हती की, ती नॉमिनेट त्याच्यासाठी झाली होती. आणि आता तो कुठेतरी कारणीभूत ठरला ती बाहेर जाण्यासाठी...
बघूया आज घरामध्ये अजून काय काय घडलं. ? तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.