By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 46 : या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार आणि कोण सेफ होणार?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. आता या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोण नॉमिनेट होणार आणि कोण सेफ होणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. आणि याच संदर्भातील आज विकास आणि विशाल तर दुसरीकडे जय, मीरा आणि उत्कर्षची चर्चा सुरू आहे.

 

जयचे म्हणणे आहे, पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही मला आणि दादूसला तर नॉमिनेट करणार नाही. जो नॉमिनेट झालेला सदस्य आहे तो तुमच्यासोबत धावणार... परत दुसर्‍या राऊंडमध्ये तुमच्याकडेच येणार आहे. तुम्हांला दोघांनाच उचलायचे आहे ते. नॉमिनेट सदस्य असूनदेखील तुम्ही उचल तर तुम्ही आम्हांला नॉमिनेट नाहीच करणार आहे. तुम्ही यांच्यामधलं एक ट्राय करणार ना ? उत्कर्ष म्हणाला, fair आहे तू पळ... मीरा म्हणाली मी धावणार पण... जय म्हणाला, सोनालीला कर हा ... मीरा म्हणाली मी तेच करणार आहे. उत्कर्ष म्हणाला, तिचं उचलणार कोण हा मुद्दा आहे... जय म्हणाला कोणीपण उचलू दे ...

तर दुसरीकडे, विकास आणि विशाल यांचीदेखील चर्चा सुरू आहे... विकास विशालला सांगताना दिसणार आहे, मला असं वाटतं तो सोनाली किंवा मीनलला करेल. विशाल म्हणाला, आपण समजा दादूस यांना घेतलं तर ? विकास म्हणाला, तर तो approve नाही करणार.

बघूया काय होतं ते आज... तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive