बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्यांना करावी लागणार आहे मास्यांची विक्री. बघून प्रश्न पडणारच बिग बॉसचं घर आहे की मासळी बाजार ? हा टास्कचं तसा आहे... आता या टास्कमध्ये कोणती टीम जिंकणार हे कळेलच पण, सदस्य या टास्क दरम्यान बरीच धम्माल मस्ती करत आहेत. सदस्य मासे विक्री करताना अशी किंमत लावत आहेत की तुम्हांला देखील प्रश्न पडेल नक्की हे मासे कुठले आहेत ?
मीनल जयला मास्यांची किंमत विचारताच जय म्हणला अडीच हजार. मीनल त्यावर म्हणाली सगळे अडीच हजारला द्या. जय त्यावर म्हणाला, काय बोलता तुम्ही. सोन्याचा मासा आहे, सोन्याचा... गायत्री म्हणाली अडीच हजारला कुठे असतो का मासा... जय म्हणाला, उत्कर्ष आमचे मालक आहेत बोटीचे. गायत्री म्हणाली तीनशे रूपायाला द्याना मला मासा.
तर दुसरीकडे, सोनाली विकासमध्ये देखील सुरू आहे मास्यांची विक्री. सोनाली विकासला म्हणणार आहे मी तीन हजारमध्ये घेणार आहे मास्यांची पाटी. विकासचे म्हणणे आहे परवडत नाही... आठ हजारवरून तुम्ही तीन हजारवर आलात... विशालचे म्हणणे आहे, अजिबात परवडत नाही. सोनाली त्यावरून विशाल आणि विकासची वाद घालताना दिसणार आहे, हे नुसते कागद नाही याला किंमत आहे... काय डायरेक्ट जेट्टीवरून माल उचलला आहे
का ? विशाल सोनालीला सांगणार आहे, हा मासा कुठे भेटत नाही लक्षात ठेवा... तुम्हांला माहिती नाही माझा अभ्यास आहे मास्यांचा, हा मासा कुठेचं नाही मिळतं. हा मासा आठ हजार रुपयाला जातो परदेशात. एक मासा आठ हजार...
बघूया कितीला विकले जातील बिग बॉस मराठीच्या घरातील मासळी बाजरातील हे मासे. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.