By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 50: मीनलने केला विकासला समजावण्याचा प्रयत्न पण.....

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सोनाली आणि मीनलच्या चर्चेनंतर, मीनल विकासला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण, विकासला कुठेतरी तिचे म्हणणे पटत नाहीये असे दिसून येते आहे. मीनल विकासला सांगताना दिसणार आहे, माझं असं म्हणणं आहे, मस्करी मस्करीमध्ये थोडं जास्त होतं आहे.

 

जाऊ दे विकास कारण का त्रास होतो आहे तिला चांगलं नाही वाटतं आहे. विकास त्यावर म्हणाला, आता मी आजचा incidence तुला सांगू... मीनल म्हणाली, नको करूस. प्लीज. विकास त्यावर म्हणाला, कारण मी करेक्ट आहे हे तुम्हांला ऐकायचंच नाहीये. तुम्हांला हे सिध्द करायचे आहे तू चूक आहेस. 

मीनल म्हणाली, असं काही नाही. याच्यापुढे नको करू. माझं तुला हे सांगण आहे, यापुढे तुला जे योग्य वाटेल ते कर विकास. विकास म्हणाला, मला जे योग्य वाटेल ते मी करणार आणि तुला जे योग्य वाटेल ते तू करणार ठरलं आहे ना ... मीनल म्हणाली, नको वाढवूस त्या गोष्टी पर्सनल लेवलवर.

 

 

विकासला वाटते आहे त्याला व्हिलन बनवत आहेत... त्याचे मीनलला सांगणे आहे तू त्याच्यात सामील नको हाऊस आता हे भांडण, गैरसमज अजून किती वाढणार, एकमेकांना हे समजून घेणार का ? हे प्रश्न आहेतच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive