काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडले “Knock Out” हे नॉमिनेशन कार्य. ज्यामध्ये सोनाली, विकास, गायत्री, मीनल घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले. आज बघूया काय होते. पण, यामुळे विकासला असं वाटतं आहे विशालने त्याचा विश्वासघात केला आणि हीच गोष्ट तो सोनालीसमोर बोलून दाखवणार आहे.
विकास सोनालीला म्हणाला, विशाल निकमने परत एकदा स्वत:ला सेफ करून घेतला. म्हणून मी जयला म्हणालो आधी त्याला नॉमिनेट कर मग मला कर. त्याला पण कळू दे विश्वासघात काय असतो. सोनालीचं म्हणणं आहे, हे जरी कटू सत्य असलं तरीदेखील त्यांच्यासाठी तुझ्यापेक्षा तोच उजवा आहे. विकासचे म्हणणे आहे, मला माहिती आहे आम्ही येणार पण आधी तो आला पाहिजे. ...