By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 55 : सदस्यांच्या भेटीला येणार सुबोध भावे आणि पूजा सावंत

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही खास पाहुणे भेटायला जातात. सदस्यांसोबत ते धम्माल मस्ती करतात, काही गेम्स खेळतात, त्यांना टास्क देतात आणि सदस्यांच्या घरातील खेळाबद्दल काय वाटते आहे, त्यांचा आवडता सदस्य कोण हेदेखील सांगतात.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणार आहेत दोन खास पाहुणे सुबोध भावे आणि पूजा सावंत. यांची एंट्री होताच सदस्यांची चांगलीच तारांबळ उडणार आहे, कारण हे दोघं सदस्यांना देणार आहेत भन्नाट टास्क. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांनी एकत्र एका मालिकेत काम केले असून त्याला घरामध्ये बघितल्यावर गायत्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला. 


 
बघूया सदस्यांना ही दोघे कोणकोणते टास्क देणार ? आणि सदस्य किती धम्माल मस्ती करणार ते आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive