By  
on  

म्हणून महेश मांजरेकरांच्या जोडीने सिध्दार्थ होस्ट करतोय बिग बॉस शो

बिग बॉस मराठी आणि महेश मांजरेकर म्हणजे जणू समिकरणच आहे. त्यांच्याशिवाय या शोची कल्पनाच करवत नाही. त्यांच्या खुमासदार शैलीतील सूत्रसंचलन व विकेंडला ते घेत असलेली स्पर्धकांची शाळा याकडे प्रेक्षक आठवडाभर डोळे लावून बसलेले असतात. सध्या बिग बॉसचा तिसरा सीझन ऐन रंगात आला आहे. लवकरच बिग बॉसच्या ३ सीझनच्या ट्रॉफीवर विजेता आपलं नाव कोरणार आहे. शोचा फिनाले अगदी तोंडावर आला आहे आणि अशातच सर्वांचे लाडके महेश मांजरेकर हे मागच्या आठवड्यातला चावडीतून काही वेळ गायब होते. त्यामुळेच ते या शोमधून सुध्दा गायब होणार का अशा चर्चा रंगल्या. त्यातच महेश सरांच्या अनेक मोठ्या सिनेमांच्या घोषणासुध्दा झाल्या आहेत तेव्हा ते या कामात व्यस्त आहेत की प्रकृतीच्या कारणास्तव ते लवकरच कळेल.

मराठी सिनेसृष्टीचा एनर्जी मॅन सिध्दार्थ जाधवने महेश सरांसोबत बिग बॉसचा ग्रॅण्ड प्रिमीयर होस्ट केला होता , त्यामुळेच आता फिनालेपर्यंतच्या प्रवासातसुध्दा लाडका सिध्दू महेशसरांसोबत दिसणार आहे. 

 थोडेच भाग शिल्लक असताना अनेकांनी ते शो का सोडत आहेत असा प्रश्न देखील उपस्थित केला होता. पण यावर अद्याप कोणतही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही, त्यामुळे येत्या भागातच महेश सर आणि बिग बॉस या समिकरणाचा उलगडा होईल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive