By  
on  

बिग बॉस मराठी 3 : विकास मीनलला म्हणाला, “कॅप्टन झाली म्हणून डोक्यावर बसू नको”

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आजटास्क दरम्यान मीनल आणि विकासमध्ये जोरदार राडा होणार आहे. मीनलने घेतलेल्या Unfair निर्णयाचा कुठेतरी विकासला राग आला आहे आणि त्याने तो व्यक्त केला. विकास दुखवला गेला असे नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बघायला मिळते आहे.

प्रोमोमध्ये जय आणि उत्कर्ष केक खाताना दिसतं आहेत, हा टास्कचाच एक भाग आहे. ज्यामध्ये विकास बोलताना दिसणार आहे, मीनल शहा यांनी या सिझनचा सगळ्यात मोठा Unfair decision दिलेला आहे. मीनल चिडून त्यावर म्हणली, तू नेहेमी रडत असतो, विशालला सांगताना दिसणार आहे, स्वत: जेव्हा perform करायचं होतो individual तेव्हा काय perform केलं त्यानं.  विकास म्हणाला, कॅप्टन झाली म्हणून डोक्यावर बसू नको. मीनलला राग अनावर झाला आणि ती विकासला म्हणाली, मग तू घरी जा...

बघूया हा वाद अजून किती वाढत गेला आजच्या भागामध्ये. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive