By  
on  

बिग बॉस मराठी 3 : विशाल – विकास VS सोनली – मीनल...

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून टिकिट टू फिनाले मिळवण्यासाठीचा टास्क सुरू झाला आहे. प्रत्येक टीम १०० टक्के देण्याचा प्रयत्न करत आहे. पण, टीम B मध्ये सगळं नीट सुरू नाहीये असे दिसून येतं आहे. विशाल आणि विकास मीनलवर नाराज आहेत. तर मीनल आणि विकासमध्ये टास्कवरून जोरदार राडा होणार आहे. ज्यामध्ये विकास असं देखील बोलून दाखवणार आहे कॅप्टन झाली म्हणून डोक्यावर बसू नकोस. आणि नंतर वादाला सुरूवात झाली. आजदेखील विशाल – विकास यावर चर्चा करताना दिसणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये या ग्रुपमध्ये आता फुट पडली आहे असे दिसते आहे.

मीनलचे म्हणणे आहे, एवढं मनापासून खेळले आहे मी या लोकांसाठी, मी काय एकटी survive नाही करू शकतं. विकास विशालला सांगताना दिसणार आहे, या घरात प्रत्येकजण एकटं survive करू शकतं... आणि आपल्या ग्रुपमध्ये करुचं शकतं. मीनल दुसरीकडे म्हणताना दिसणार आहे, माझ्यामुळे त्यांचा फायदा झाला आहे. विशालचे म्हणणे, प्रत्येकाने केले पण तू बोलून दाखवलं याला काही अर्थ नाही. कशाला मग ग्रुप ग्रुपचं नाटकं करायचे...

बघूया अजून या सदस्यांमध्ये पुढे काय चर्चा झाली ते आजच्या भागमध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive