By  
on  

बिग बॉस मराठी 3 : मीनल म्हणते, “जयने अजिबात Creativity दाखविली नाही”

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज मीनल आणि सोनाली तर दुसरीकडे उत्कर्ष आणि मीरा यांच्यामध्ये चर्चा होताना दिसणार आहे.

मीनल आणि सोनाली विकास आणि जयबद्दल बोलताना दिसणर आहेत तर मीरा उत्कर्षला नक्की कोणाबद्दल बोलत आहेत हा प्रश्नच आहे. मीनल सोनालीला सांगताना दिसणार आहे कार्या दरम्यान तिला जयची वा विकासची creativity दिसली नाही.

मीरा उत्कर्षशी बोलताना दिसणार आहे, मुद्दे नव्हते माहिती नंतर ऐकलंस तू. गोष्टी ऐकत होतास ? त्याच त्याच गोष्टी नवीन असं काही निघत नव्हतं. कित्येक गोष्टी तर म्हणजे असं काय बोलंत आहे... काहीही बोलतो आहे का असं होत होतं.

दुसरीकडे मीनल सोनालीशी बोलताना दिसणार आहे. मीनल सोनालीला तिचे मत सांगणार आहे, मी हे म्हणते as a individual मला कुठेतरी विकास पाटील खरंच वीक वाटतं होता जितके लोकं perform करतं होते टास्कमध्ये किंवा वेशभूषा तेव्हा तो व्यवस्थित करू शकला नाही. जेव्हा टीम टास्क होता तुमच्यासोबत खेळत होता तेव्हा पण कुठे एफर्ट टाकत होता तो ? आणि जयसुध्दा तितके चांगले एफर्ट्स नव्हता टाकत. कोणती creativity दाखविली, काय वेगळेपण दाखवलं ? मला दिसलं नाही ते...

 

पुढे काय  झाले जाणून घ्या आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive