बिग बॉस मराठी 3 : आठवड्याच्या मध्यावर झालं एलिमिनेशन, मीरा जग्गनाथ घराबाहेर

By  
on  

बिग बॉस मराठी सिझन 3 च्या फिनालेसाठी अवघे काहीच दिवस बाकी आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात 6 फायनलिस्ट पाहायला मिळत होते. यातच फिनालेच्या आठवड्यात एक एलिमिनेशन होणार असल्याचं महेश मांजरेकर यांनी यापूर्वी सांगितलं होतं. त्यानुसार महेश मांजरेकर यांनी आठवड्याच्या मध्यावर येत टॉप 5 मधून कोण घराबाहेर गेलं हे जाहीर केलं.अभिनेत्री मीरा जग्गनाथला घरातून एक्जिट ग्यावी लागली. कमी मतं मिळाल्याने ती टॉप ५च्या स्पर्धेतून बाहेर पडली आणि या सीझन ३ ला मिळाले टॉप 5 फायनलिस्ट. 

 

घराबाहेर जाताना मीराला अश्रू अनावर झाले. ती प्रचंड रडत होती. 90 दिवसांपेक्षा जास्त प्रवास तिने या घरात केला होता. इथला कोपरा अन कोपरा आणि वस्तू आणि वस्तू मी माझी मानत असल्याचं मीराने घराचा निरोप घेताना सांगितलं. 

 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता उरले TOP ५ सदस्य म्हणजेच विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा. आता विजेतेपदाची ट्रॉफी कोण पटकावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Recommended

Loading...
Share