By  
on  

Big Boss Marathi 4 - Day 21 "“…आता मी तिला नाही थांबवणार …” – तेजस्विनी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या नॉमिनेशन रॉकेट या कार्यामुळे दोन्ही ग्रुपमध्ये आणि सदस्यांमध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. अपूर्वा आणि विकासच्या चर्चेनंतर आता तेजस्विनी देखील अमृता देशमुख, प्रसाद आणि योगेशसोबत चर्चा करताना दिसणार आहे. अमृता देशमुखचे म्हणणे आहे तिला दुसऱ्या ग्रुपसोबत खेळून बघायचे आहे. ज्यावर तिला तिच्या ग्रुपमधील सदस्यांनी समजावून सांगितले... पण ती तिच्या निर्णयावर ठाम आहे.

तेजस्विनी सांगणार आहे, प्रसाद तुला सारखं जर तिला त्या ग्रुपमध्ये नको जाऊ असं करायचं असेल तर तू करत जा, कारण तिने देखील बघितले आहे तो ग्रुपदेखील equally तयार होता तिला नॉमिनेट करायला. तो वेगळा भाग झाला... पण मला प्रसादला personally सांगायचे आहे, मी अमृताच्या individuality चा खूप आदर करते, त्यामुळे आता मी तिला नाही थांबवणार. कारण मला देखील वाटतं कोणी खुश नसेल तर… पण तू ग्रुप फुटेल म्हणून तिला नको थांबवूस. आता आपल्या ग्रुपमधले जवळजवळ सगळेच नॉमिनेट झाले आहेत. आपण कोणाला अडवून कोणाची growth नको थांबवायला. 

आज बघूया यावर योगेश, प्रसाद आणि अमृता देशमुख यांचे काय म्हणणे आहे. बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive