बिग बॉसच्या घरातील चौथे एलिमिनेशन पार पडले. निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे, योगेश जाधवला आणि त्या पाठोपाठ कॉमन मॅन त्रिशूल मराठेचा प्रवास संपला. त्यालाही घराबाहेर जावं लागलं. ‘बिग बॉस मराठी ४’ची चावडी रंगली होती. यावेळी महेश मांजरेकरांनी चावडीवर बऱ्याच सदस्यांची शाळा घेतली? कोण कुठे चुकले? कोण बरोबर खेळले या सगळ्याचा हिशोब घेतला. किरण माने आणि विकास सावंत यांचे महेश मांजरेकरांनी त्यांच्या खेळाबद्दल कौतुक केले. तर वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन आलेल्या स्नेहलात वसईकर हिला खडे बोल सुनावले. या एपिसोडच्या शेवटी त्रिशूल मराठे याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
बिग बॉसच्या घरात आतापर्यंत स्पर्धक म्हणून सेलिब्रिटी आणि विविध क्षेत्रातील लोकप्रिय चेहरे सहभागी झाले. पण या पर्वात त्रिशूलच्या रूपाने पहिल्यांदाच सामान्य नागरिक सहभागी झाला होता.
त्रिशूल घराबाहेर जाताना खुद्द महेश मांजरेकरांचेही डोळे पाणावले होते. आयुष्यात कधीही गरज लागली तर माझ्याशी संपर्क साध असंही मांजरेकरांनी त्रिशूलला सांगितलं.