बिग बॉस मराठीच्या घरामध्ये "विषय END" हे नॉमिनेशन कार्य काल पार पडले. या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेत यशश्री, स्नेहलता, प्रसाद, रुचिरा, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी हे सदस्य नॉमिनेट झाले. अक्षय आणि टीम B ने मिळून रुचिराला नॉमिनेट केले. आज रुचिरा - रोहितमध्ये तसेच अपूर्वा आणि समृद्धी मध्ये चर्चा रंगली आहे. रुचिरा - अपूर्वा मध्ये सुरु झालं COLD WAR
अपूर्वा समृद्धीला सांगताना दिसणार आहे, माझ्या आणि प्रसादच्या argument मध्ये मी देशमुखला काय म्हणाले stay out of this. विषय माझा आणि त्याचा आहे आम्ही ते बघून घेऊ तुला विचारला आहे का? तुझा मुद्दा आला तेव्हा आपण बोलू. मग तसं मी रिस्पेक्ट केलं तुम्ही दोघ बोलून घ्या जेव्हा तुमचं होईल तेव्हा मला सांग. मी तिला काय बोले रात्री तुला बोलावंस वाटलं कि सांग मला पण आता नाही मला झोप येते आहे उद्या बोलू. रुचिरा आणि रोहितची नॉमिनेशन वरून चर्चा रंगली आहे.
रुचिराचे म्हणणे आहे, जो निकष दिलाच नव्हता साप्ताहिक कार्याची कामगिरी, त्या नसलेल्या निकषावर त्यांनी मला नॉमिनेट केलं आहे. अपूर्वा समृद्धीला सांगताना दिसणार आहे, जेव्हा मी नॉमिनेट झाले होते तेव्हा किती लोकं आली होती. केवढे लोकं येऊन बोले होते माझ्या बाजूने. मी माझ्या प्रॉब्लेमला केलं ना डील माझं. समृद्धीचे म्हणणे आहे, सगळेच करतात मी पण केलं. रुचिरा रोहितला सांगताना दिसणार आहे, नेहेमी रुचिरा patience ठेवेल... माझे patience काढताना ती एक वाक्य म्हणाली माझे patience नव्हते. तुझे patience संपले आहेत, माझे संपले नाहीयेत patience पण माझे sequence wise संपत आहेत...
पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा.