बिग बॉस मराठीच्या घरात राडे, भांडणं, टास्क, राग, रुसवे सुरू आहेत. स्पर्धकांचे खरे चेहरे एकमेकांसमोर आले आहेत. घरात वेगवेगळ्या स्वभावाची अनेक माणसं एकत्र आली आहेत.त्यामुळे दर दिवशी नवं भांडण ठरलेलंच. पण काहींना एकमेकांबद्दल सॉफ्ट क़ॉर्नर असल्याचंही पाहायला मिळतंय.
प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत हे पहिल्या दिवसापासून पाहायला मिळालं आहे. घरात प्रसादचं कोणाबरोबर पटत असेल कर ती एक व्यक्ती म्हणजे अमृता देशमुख. दोघांमध्ये कमालीचं बॉडिंग आहे. अनेक वेळा प्रसाद अमृताजवळ जाऊन आपलं मन मोकळं करताना दिसला आहे.
तर अनेकदा महेश मांजरेकर देखील दोघांना चिडवताना दिसले आहेत. पण अखेर बिग बॉसच्या घरात प्रसाद अमृताला त्याच्या हटके स्टाइलने प्रपोज केलं. गमतीचा भाग का असेना पण दोघांनीही ते खुप एन्जॉय केलं.