Big Boss Marathi 4 - अक्षयला सामोरे जावे लागणार सदस्यांच्या रागाला...

By  
on  

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या “सोसल तितकंच सोशल" टास्कमध्ये सदस्यांच्या सहनशक्तीचा कस लागला. काल प्रसाद, तेजस्विनी, रोहित टास्कमधून बाहेर पडले. आज अक्षयला प्रसाद, अपूर्वा, विकास, रोहित सगळेच जाब विचारणार आहेत कि त्याने असे का केले ?

प्रसाद आणि अपूर्वा विचारताना दिसणार आहेत, अक्षा तू दोन ते तीन ग्रेड अंडी फोडलीस ? तू ती वेस्ट केलीस एवढी लागली देखील नसती कदाचित ... अक्षयने विचारले, कोण म्हणाले मी वेस्ट केली? अपूर्व, तेजस्विनी, प्रसाद म्हणलं, मग कोण फोडली ? दुसरं कोण आहे ? अक्षयचे म्हणणे आहे, असं कोण बोल कि मी वेस्ट केली ? प्रसाद म्हणाला, मी बोलो तू  तीन ग्रेड अंडी वेस्ट केली आहेस काय करायचे त्याच्याबाबत ? अक्षयचे म्हणणे आहे, काय करणार मला नाही माहिती, रणनिती असू शकते... प्रसाद म्हणाला कोणाची रणनिती ? अपूर्वाचे म्हणणे आहे, रणनिती कशी असू शकते ? ब्रेकफास्टला लागतं ना ? अक्षयचे म्हणणे आहे, सी सॉ टास्कला गव्हाचे पीठ संपलं होतं सगळ्यांनी सफर केलं होतं कि नाही? अपूर्वा म्हणाली, ९० अंडी फोडली ? बघूया पुढे काय होईल ? अक्षयचे त्याचे म्हणणे पटवून देऊ शकेल कि जे बाकीच्या सदस्यांना वाटते आहे त्याने चूक केली आहे ते मान्य करेल ?

 

 

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Recommended

Loading...
Share