Big Boss Marathi 4 : बिग बॉसने घेतला मोठा निर्णय! घरातून होणार दोन सदस्यांची एक्झिट

By  
on  

बिग बॉस मराठी ४ चा हा सीझन यंदा अनेक कारणांनी चर्चेत आहे. नेहमीप्रमाणेच एक टीम दुस-या टीमवर भारी पडताना पाहायला मिळतेय. एकापेक्षा एक स्पर्धक एकमेकांना कॉंटे की टक्कर देतायत. या खेळात 16 जण सहभागी झाले होते. त्यापैकी निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे, योगेश जाधव, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव आहेत. आता बिग बॉसच्या घरातील बाहेर पडणारा पुढचा स्पर्धक कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आज होणाऱ्या भागात कोणते स्पर्धक स्पर्धक बाहेर जाणार आहेत याविषयी कळणार आहे. याचा एक प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे.

, बिग बॉसने यावेळी मोठा निर्णय घेतला असून यावेळी घरातून दोन स्पर्धकांची एक्झिट होणार आहे. बिग बॉसने घरातील सदस्यांना त्यांच्या पाट्याही काढायला सांगितलं. तेव्हा नॉमिनेट झालेले सगळेच सदस्य खुपच भावूक झाले. बिग बॉसच्या या दुहेरी एलिमिनेशच्या निर्णयामुळे सदस्यांचंही टेन्शन वाढलं असून सगळेच चिंतेत आहे. आता बाहेर जाणाऱ्या स्पर्धकांपैकी कोण दोन सदस्य असणार हे आजच्या भागात कळेल. 

यावेळेस किरण माने, प्रसाद जवादे, तेजस्विनी लोणारी, अमृता धोंगडे, अमृता देशमुख, आणि यशश्री मसूरकर  हे सहाजणं नॉमिनेट झाले आहेत. ह्यापैकी 

Recommended

Loading...
Share