Big Boss Marathi 4 : टुकटूक राणी फेम अभिनेत्री यशश्री मसूरकरचा बिग बॉसच्या घरातला प्रवास संपला

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात यंदा भूतो न भविष्यती असं घडलं. पहिल्यांदाच चावडीवर दोन सदस्यांना घराबाहेर जावं लागणार असल्याचं जाहीर झालं.  टुकटुक टुक राणी फेम अभिनेत्री यशश्री मसूरकरला यावेळेस घराबाहेर पडावं लागलं. यशश्रीबरोबर किरण माने, अमृता देशमुख, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी डेंजर झोनमध्ये होते. त्यातून यशश्रीला घराबाहेर पडावं लागलं. अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी सेफ झाल्या.

यशश्री आऊट झाल्यानंतर ती घरातील कोणत्याही सदस्याला बाय न करता घरातून निघून गेली.

घरातील सदस्यांना शेवटचं भेट असं सांगूनही ती कोणाला भेटली नाही.  घरातून बाहेर पडताना ती सदस्यांना भेटली असती तर खूप इमोशनल झाली असती आणि मला रडायचं नव्हतं म्हणून मी कोणाला भेटली नाही, असं तिनं महेश मांजरेकरांना सांगितलं

 

Recommended

Loading...
Share