बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन अनेक कारणांनी चर्चेत राहण्यासाठी धडपडत आहे. या आठवड्यात चार चॅलेंजर्सचा प्रवेश झाल्याने घराचं रुपडचं बदलून गेलं आहे. मीरा जगन्नाथ, आरोह वेलणकर, विशाल निकम आणि राखी सावंत यांच्या येण्याने अनेक धमाके घरात पाहायला मिळाले. त्यातली रिअल एन्टरटेनर राखी सावंत घरात सर्वांचंच खुप मनोरंजन करते. नुकतंच राखी आणि किरण माने यांच्यातला एक धम्माल व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
कॅप्टन असलेल्या अक्षय केळकरने राखीला घरात झाडू मारायची ड्यूटी लावली. सुरुवातीला प्रचंड टाळाटाळ करुन अखेर राखीने झाडू हातात घेतलाच. नऊवारी नेसलेल्या राखीला काम करताना पाहून किरण माने तिच्या मदतीला धावले आणि धम्माल हशा पिकला.
राखी यावर उत्तर देत म्हणते, “इथे हे झाडू मारायला नाही, डोळा मारायला आले आहेत”. त्यानंतर किरण माने राखी सावंतचा पदर पकडून संपूर्ण घरात तिच्या मागेमागे फिरताना व्हिडीओत दिसत आहेत. राखी झाडू घेऊन घरात फिरत आहे. किरण माने व राखी सावंतचा हा मजेशीर व्हिडीओ आहे.सोबत किरण माने गाणंही गातायत, 'अश्विनी ये ना........'