बिग बॉस मराठी ४ चा हा आठवडा खुपच गाजला. घरात आलेल्या ४ चॅलेंजर्सनी घर दणाणून सोडलं आणि पहिल्या दिवसापासून असलेल्या स्पर्धकांचे धाबे दणाणले. या आठवड्यात चॅलेंजर्सनी नॉमिनेशन प्रक्रियेत सहभाग घेतला आणि चार स्पर्धकांना नॉमिनेट केलं. अपूर्वा नेमळेकर, अमृता देशमुख, प्रसाद जवादे आणि रोहित शिंदे है चौघं या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले होते. परंतु कमी मतं मिळाल्याने रोहित शिंदेला बिग बॉसचं घर सोडावं लागलं.
‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात झळकलेली बोल्ड जोडी म्हणजे अभिनेत्री रुचिरा जाधव आणि तिचा बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदे. यातील रुचिरा घराच्या बाहेर पडली आहे. तिच्या पाठोपाठ आता डॉ. रोहित शिंदे हा सुद्धा घराबाहेर पडला आहे. रोहितने घर सोडताना घराला नमस्कार केला. घरात सर्वांशी अदबीने वागणारा रोहितच्या जाण्याने सदस्या भावूक झाले
रोहित हा पेशाने डॉक्टर आहे. त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे. ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे. बिग बॉस मराठी सीझन ४ मुळे तो महाराष्ट्रातील तरुणाईचा लाडका ठरला.
पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? यासाठी बिग बॉस पहावंच लागेल.