बिग बॉस मराठीचं यंदांचं चं ४ थं पर्व अनेक कारणांनी चर्चेत आहे. विविध टर्न्स आणि ट्विस्टमधून हा रिएलिटी शोचा खेळ प्रेक्षकांसमोर येतोय. यावेळेस चावडीवर दोन एलिमिनेशन झाले म्हणजेच दोन स्पर्धकांना घराबाहेर जावं लागलं. पहिला विकास सावंत घराबाहेर पडला तर रविवारच्या भागात पुण्याची टॉकरवडी फेम अभिनेत्री अमृता देशमुख घराबाहेर पडलीय. सुरुवातीच्या दिवसांत अमृताचा घरातील वावर फार कमी होता. परंतु, नंतर तिने स्वत:ला सिद्ध करत खेळ खेळायला सुरुवात केली होती. टास्कदरम्यानही तिची आक्रमकता दिसून आली होती. त्यामुळे हळूहळू इम्प्रूव्ह होत इथपर्यंत मजल गाठणारी स्पर्धक म्हणून अमृता देशमुखकडे पाहिलं जातं.
अमृता देशमुख ही घरात प्रत्येक आठवड्याला नॉमिनेशनमध्ये यायची. वाद-विवादांमध्ये मुद्देसुद बोलणं, वाकचातुर्य आणि हजरजबाबी पण यामुळे अमृताचं अनेकदा कार्यक्रमाचे होस्ट महेश मांजरेकर यांनीसुध्दा कौतुक केलं होतं. बिग बॉस मराठीच्या या 4 थ्या सीझनमध्ये टिकून राहम्याची तिची धडपड आणि तळमळ प्रेक्षकांना वेळोवेळी दिसलीय.
‘फ्रेशर्स’ या शोमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. तिने मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्रीबरोबरच अमृता एक आर.जे. ही आहे. पुण्याची टॉकरवडी म्हणून ती प्रसिद्ध आहे.