बिग बॉस मराठीचा यंदाचा 4 था सीझन यंदा अनेक कारणांनी चर्चेत आहे. आता बिग बॉस मराठी 4 चा प्रवास हळहळू महाअंतिम सोहळ्याच्या दिशेने सुरु झाला आहे.
चौथ्या सीझनमध्ये 16 स्पर्धकांनी एंट्री केली. एकाहून एक तगडे स्पर्धक प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र बिग बॉस मराठीचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या तितकासा पचनी पडला नसल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसत आहे. मात्र तरीही प्रेक्षक शो आवर्जुन पाहताना दिसत आहेत. आपली मतं माडताना दिसतायत. एकामागून एक स्पर्धकांनी निरोप घेतल्यानंतर आता घरात किरण माने, प्रसाद जवादे अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, अरोह वेलणकर हे सदस्य राहिले आहेत.
आता केवळ दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. येत्या नववर्षाच्या सुरुवातीला बिग बॉस मराठीचे चौथे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.बिग बॉस मराठी ४ चा ग्रँड फिनाले येत्या ८ जानेवारी २०२३ ला संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे पण कलर्स मराठीकडून याबाबत अद्याप कुठलीच माहिती समोर आलेली नाही.
अनेक ट्विस्ट आणि टर्न्सने भरलेल्या या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार याकडे आता अख्या महाराष्ट्राचं लक्षल लागलं आहे.