बिग बॉस मराठीच्या खेळात सहभागी झाल्यानंतर कधी कोणाचं कसं नशीब पालटेल याचा काही नेम नाही. कार्यक्रमाचे होस्ट आणि सुप्रसिध्द दिग्दर्शक महेश मांजरेकर काही स्पर्धकांना त्यांच्या सिनेमात कास्ट करतात. याचं ताजंच उदाहरण म्हणजे जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विशाल निकम या बिग बॉसच्या तिस-या पर्वातल्या टॉपच्या स्पर्धकांना त्यांनी त्यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या ऐतिहासिक सिनेमात झळकण्याची संधी दिलीय. आता ह्यांच्याप्रमाणेच बिग बॉस मराठीच्या ४ थ्या सीझनमधून नुकताच बाहेर पडलेला विकास सावंतलासुध्दा लॉटरी लागलीय.
विकास सावतंने या मुलाखतीत घरातील सदस्य व खेळाबाबत अनेक खुलासे केले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विकास सावंतला लॉटरीही लागली आहे. ‘बिग बॉस मराठी’चे होस्ट व मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी विकासला चित्रपटाची ऑफर दिली आहे. याचा खुलासा मुलाखतीत विकासने केला.
“महेश मांजरेकर सरांकडून मला चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. मी खरंच खूप खूश आहे. माझ्या भविष्यकाळातील प्रोजेक्टसाठी मी उत्सुक आहे. कोरिओग्राफर होण्याचं स्वप्नही मला पूर्ण करायचं आहे. बिग बॉसने मला सर्व काही दिलं आहे. यासाठी मी त्यांचा आभारी आहे”, असं विकास म्हणाला.
अभिनेते किरण मानेंसोबतची विकासची मैत्री लक्षवेधी ठरली.