बिग बॉस मराठी ४ हा रिएलिटी शो सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. हा शो आता उत्तरार्धाच्या दिशेने वाटचाल करतोय. घरात फक्त आता राखी सावंत, आरोह वेलणकर, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, किरण माने, अपूर्वा नेमळेकर आणि अमृता धोंगडे हेच स्पर्धक उरले आहेत. बिग बॉसचा हा फॅमिली वीक सुरु आहे. ह्यात स्पर्धकांचे कुटुंबिय त्यांना काही क्षण भेटायला येतात. घरापासून-कुटुंबापासून दूर असलेल्या कुटुंबियांना काही क्षण भेटून त्यांना पुन्हा नव्याने लढण्याची उर्जा मिळते.
काल घरात अमृता धोंगडेचे आई-वडील, किरण मानेंची पत्नी आणि मुलं तर अपूर्वा नेमळेकरची आई व मामा भेटायला आले होते. तेव्हा सगळ्यांनी एकमेकांशी छान भेट घेतली. गप्पा मारल्या. खेळाबदद्ल शुभेच्छा दिल्या आणि घरच्यांनी त्यांच्यासाठी आणलेला खाऊसुध्दा त्यांना घरात खायला मिळाला. हे आनंदाचे व अविस्मरणीय क्षण सगळे अनुभवत होते.
दरम्यान, बिग बॉस मराठी ४ मध्ये सुरुवातीपासूनच चर्चेत असलेली अपूर्वा नेमळेकर आपल्या आईला घरात पाहून भावूक झाली. ढसाढसा रडू लागली. त्यानंतर आईने तिची गळाभेट घेतली. तेव्हा अपूर्वा सोडून सर्व सदस्य फ्रीज होते. अपूर्वाची आई सर्वांना भेटली आणि मग महत्त्वाचा सल्ला देण्यासाठी ती तिला सगळ्यांपासून लांब बेडरुममध्ये घेऊन गेली.
“अपूर्वा तू छान खेळत आहेस. तुला सगळ्यात जास्त धोका अक्षय केळकरपासून आहे. त्याच्यापासून दूर राहा. तू तुझं खेळ”, असं अपूर्वाची आई तिला म्हणाली. यावर अपूर्वा “विश्वास ठेवणं हे माझं काम आहे. समोरच्याला फसवायचं असेल तर मी काही करू शकत नाही”, असं आईला म्हणते. अपूर्वाच्या मामानेही तिला अक्षयपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.
तसंच अपूर्वाच्या आईने विकास व तिच्या मैत्रीचं खुप कौतुक केलं. ते खुप छान दिसत होतं असं म्हणाली. तसंच अपूर्वाच्या मामाने तिला तू दोन आठवड्यांपासून शात वाटतेस तेव्हा आता पुन्हा चार्ज हो आणि एंटरटेन्मेंट कर असं ते तिला म्हणाले.