बिग बॉस मराठी 4 अनेक कारणांनी सध्या चर्चेत आहे. राखी सावंतची ह्या कार्यक्रमात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून या कार्यक्रमाला एक तडका लागलाय. राखी आपल्या धम्माल वागणुकीमुळे या घरात नेहमीच हायलाईट होते. ती एक जबरदस्त एन्टरटेनर आहे हे कोणीच नाकारु शकत नाही. सामान्य घरातून आलेल्या राखीने बॉलिवूडमध्ये काम करण्यासोबतच अनेक रिएलिटी शो प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करत गाजवले आहेत.
राखी या नावाचे लाखो दिवाने आहेत. परंतु, हे तिचं खरं नाव नाही. नुकत्याच ‘बिग बॉस मराठी’च्या भागात खुद्द राखीनेच याचा खुलासा केला आहे. ‘राखी’ हे नाव महेश मांजरेकर सरांनी दिलं असल्याचं राखी म्हणाली. “करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मांजरेकर सरांनी मला नाव बदलून ‘राही’ व ‘राखी’ यापैकी एक ठेवण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा मी ‘राखी’ हे नाव निवडलं”, असं ती म्हणाली.
राखीचं खरं नाव नीरु भेडा असं आहे. असं ती नुकत्याच झालेल्या चावडीवर म्हटली. राखी आता फिनालेपर्यंत पोहचणार का, आणि बिग बॉस मराठी ४ च्या घरातले उरलेले दोन आठवडे कसे गाजवणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.