बिग बॉस मराठी 2 : घरामध्‍ये हिना -नेहामध्‍ये खुलतेय मैत्री?

By  
on  

नवीन टास्‍क 'धोबीपछाड' मध्‍ये घरातील मंडळी स्‍पर्धा करत असताना आम्‍हाला घरामध्‍ये नवीन मैत्री खुलत असल्‍याचे पाहायला मिळाले. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये वाइल्‍ड कार्ड प्रवेशक हिना पांचाळ आणि नेहा या बेडरूमध्‍ये आराम करताना त्‍यांच्‍यामध्‍ये मैत्रीचे नाते निर्माण होताना दिसत आहे. 

नेहा हिनाला ती कुठे राहते असे विचारते, हिना प्रत्‍युत्‍तर देते 'अंधेरीला'. नेहा काहीशा आठवणींमध्‍ये जात म्‍हणते, ''मी रोज यायची तिथे राम गोपाल वर्माच्‍या ऑफिसला. मी त्‍यांना असिस्‍ट केलं आहे एका फिल्‍मसाठी राइटिंग आणि क्रिएटिव्‍हसाठी!'' 
याबाबत उत्‍सुक झालेली हिना विचारते, ''तुझं प्रोफेशन काय आहे?'' या प्रश्‍नाला नेहा प्रत्‍युत्‍तर देते, ''अॅक्टिंग. मी सुरूवात केली थिएटरपासून, ७-८ वर्ष थिएटर केलं पुण्‍यात त्‍याच्‍यानंतर मुंबईला आल्‍यावर टेलिव्हिजन करायला लागले ७ वर्ष, मग रिअॅलिटी शोज केले, 'फू बाई फू', कलर्सचा 'एकदम कडक' म्‍हणून शो होता तो केला, मग आधी कलर्स नव्‍हतं ईटीव्‍ही होतं त्‍यावर 'झुंज' नावाचा एक शो होता तो केला आणि पराग पण होता त्‍या शोमध्‍ये. तो रोडीज आणि बिग बॉसचा मिक्‍स्‍चर असा शो होता, थोडा फॉर्मेट वेगळा होता आणि मी बघत आली आहे हे शोज तर मला आवडतात हे शोज.'' 

या दोन सौंदर्यवती घरामध्‍ये रोचक गप्‍पागोष्‍टी करत आहेत. पण 'बिग बॉस' घरामध्‍ये त्‍यांची मैत्री टिकून राहते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे 
तुमच्‍या आवडत्‍या स्‍पर्धकांबाबत नवीन गोष्‍टी जाणून घेण्‍यासाठी पाहत राहा वूटवरील 'अनसीन अनदेखा'!

Recommended

Loading...
Share