बिग बॉसच्या या स्पर्धकांना मराठी बिग बॉस विजेती मेघा धाडेचं समर्थन

By  
on  

बिग बॉस या शोची नेहमीच चर्चा असते. सध्या हिंदी बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाच्या बाबतीतही तसचं झालय. आता बिग बॉसच्या घरात जे स्पर्धक आहेत त्यापैकी कुणाला समर्थन द्यायचं याविषयीही बोललं जातय. मागील पर्वातील काही बिग बॉस स्पर्धकही यावर प्रतिक्रिया देत आहेत. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेनेही यंदाच्या बिग बॉसविषयी प्रतिक्रिया दिली आहे. 

मेघाने एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. ती कोणत्या स्पर्धकाला समर्थन देतेय याविषयी या व्हिडीओमध्ये बोलत आहे. मेघा धाडे ही आसीम रियाज, रश्मी देसाई, शेहनाझ गिल आणि विशाल आदित्य सिंह या चार स्पर्धकांच समर्थन करत आहेत. हे चारही स्पर्धक फायनलमध्ये जावं अशी मेघाची इच्छा आहे. या चौघांपैकी एकाने बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी अशीही मेघाची इच्छा आहे. शिवाय मेघा यात असही म्हणतेय की,  “बिग बॉसमध्ये तोच स्पर्धक जिंकतो जो खऱ्या मनाने खेळतो.” 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy belated birthday to one of the most amazing friend and the purest soul @sreesanthnair36 ️

A post shared by Megha Dhade (@meghadhade) on

Recommended

Loading...
Share