हिंदी बिग बॉसचं घर आता या ठिकाणी, ही असेल पहिली स्पर्धक 

By  
on  

सगळ्यात वादग्रस्त आणि चर्चेत राहणारा रिएलिटी शो म्हणजे बिग बॉस हा शो. प्रत्येक वर्षी नव्या सिझन आणि नव्या स्पर्धकांसह हा शो मनोरंजन करत असतो. यंदाही हा शो काहीतरी धमाकेदार घेऊन येणार यात शंका नाही. या शोच्या जास्तीत जास्त सिझनचं सुत्रसंचालन दबंगमिया सलमान खानने केलं आहे. आणि त्यामुळे या शोला दरवर्षी एक वेगळं वळण मिळतं. 


लोणावळानंतर मुंबईमध्ये बिग बॉसचा सेट उभारण्यात आला. मात्र आता सेट मुंबईत नसून दक्षिण गोव्यात उभारण्यात येईल. त्यामुळे आकर्षणाचा भाग असलेलं यंदाचं बिग बॉसचं घर कसं असेल याची बिग बॉस फॅन्सना उत्सुकता नक्कीच असेल. शिवाय यंदाच्या बिग बॉसमध्ये कोण स्पर्धक असतील याचीही बिग बॉस फॅन्स वाट पाहत आहेत. तर 14व्या पर्वाच्या पहिल्या स्पर्धकाचं नाव नुकतच समोर आलं आहे. एक प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री, मॉडेल पूनम कारेकर पूनम कारेकर गोवेकर ही यंदाच्या बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार असल्याची चर्चा आहे. शिवाय यात जास्मिन भसिन, अलिशा पवार, करण कुंद्रा ही नावंसुद्धा चर्चेत आहेत.
 

Recommended

Loading...
Share