बिग बॉसच्या घरातील सदस्य पुन्हा माजवणार अनागोंदी, कारण झाली आहे तिस-या पर्वाची नांदी

By  
on  

लॉकडाऊनमध्ये जणू करोना बिग बॉस आहे आणि आपण घरातील सदस्य आहोत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेच तेच शो आणि मालिका पाहून रसिकही कंटाळले होते. त्यामुळेच रसिकांच्या मनोरंजनाला तडका देण्यासाठी पुन्हा एकदा बिग बॉसचं घर सज्ज होणार आहे. 

 

 

या शो च्या पहिल्या दोन सीझननी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं होतं. पण आता लॉकडाऊननंतरचा नवा सीझन काय घेऊन येणार याची उत्सुकता आहे. या शोचा प्रोमो समोर आला असून काहीतरी हटके पाहायला मिळणार अशी आशा करायला हरकत नाही.

Recommended

Loading...
Share