या बॉलिवूड अभिनेत्याला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक

By  
on  

आपल्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जाणारे अभिनेता विजय राज यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहकलाकार असलेल्या 30 वर्षीय युवतीची छेड काढल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंद झाला आहे. याप्रकरणी राम नगर पोलिसांनी विजय राज यांना अटक केली आहे. 

विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या शेरनी सिनेमाचं शुटिंग गोंदियामध्ये सुरु आहे. विजय राज यांच्यावर गोंदियातील रामनगर पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354 (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विजय राज यांच्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Recommended

Loading...
Share