हिंदी मालिकेच्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या करणा-या तुनिषा शर्माचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने मनोरंजन विश्वासह संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तुनिषाचा बॉयफ्रेंड आणि या मालिकेचा नायक शिझान खानला अटक केली होती. भिनेता शिझान खानला तब्बल दोन महिन्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीत शिझानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अभिनेत्री 'अलीबाबा:दास्तान-ए-काबुल' मालिकेत मरियमची भूमिका साकारत होती. तुनिषाने काही दिवसांपूर्वी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली होती. यानंतर अभिनेत्रींच्या आईने मालिकेचा मुख्य अभिनेता आणि तुनिषाचा बॉयफ्रेंड शिजान खानवर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार केली होती. त्यांनतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होत.
तुनिषा शर्माने 24 डिसेंबरला अलीबाबा; दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली होती. अभिनेत्रीने शिजान खानच्या मेकअपरुममध्ये गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं होतं.